श्रेष्ठदान महादान महाअभियान नाशिक १८/१९फेब्रु.२०२३
कोरोनाच्या प्रकोपामुळे मागे फेकली गेलेली अवयवदान चळवळ पुन्हा सचेत अवस्थेत आणण्यासाठी, प्रबोधनच्या कार्यासाठी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण होऊन मोठ्या संख्येने अनेक कार्यकर्ते उपलब्ध झाले पाहिजेत या उद्देशाने आयोजित केलेल्या नाशिक येथील ‘श्रेष्ठदान महा अभियान’ अधिवेशनास महाराष्ट्रातील अनेक समाजसेवी संस्थांनी व कार्यकर्त्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
मार्गदर्शनासाठी उपलब्ध झालेल्या अवयव दान क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांकडून अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी खूप समाधान व्यक्त केले आणि खूप प्रभावित होऊन कामाला लागण्याचे आश्वासन दिले.