Wish to become a donor?
ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे मृत्यू दोन प्रकारे येऊ शकतो. हृदय बंद पडल्यामुळे येणारा नैसर्गिक मृत्यू किंवा मेंदू बंद पडल्यामुळे येणारा मेंदू मृत्यू.
आपल्याला कोणताही दुर्धर आजार नसतांना आपला नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आपण नेत्रदान, त्वचादान, देहदान करू शकतो. या तिन्ही पैकी कोणतेही एक-दोन किंवा ही तीनही दान आपण करू शकतो.
मेंदूवर अतिरिक्त ताण आल्यामुळे किंवा अपघाताने मेंदूला इजा झाल्यास मेंदू मृत्यू होतो. अशा वेळेस रुग्ण हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असल्यासच मेंदू मृत जाहीर करता येते. केवळ या अवस्थेमध्ये असतांनाच अवयव दान करून किमान आठ लोकांचे प्राण वाचवणे शक्य आहे.
बऱ्याच वेळा नेत्रदान त्वचादान देहदान अवयव दान या सर्वांचा एकत्रितरीत्या स्वतंत्र किंवा एकत्रितरीत्या अवयव दान असा उल्लेख केला जातो.
देहदान / अवयवदान करण्यासाठी काय करावे?
आपल्या जवळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन तेथे देहदानाचा संकल्प पत्र / फॉर्म भरावा किंवा एखाद्या सामाजिक संस्थेच्या फॉर्म द्वारे सुद्धा आपला संकल्प आपण जाहीर करून ठेवू शकतो. भारत सरकारच्या www.notto.gov.in वेबसाईटवर सुध्दा नोंद करू शकतो. संकल्पपत्र हे बहुदा आपली इच्छा कुटुंबिय, मित्रमंडळी व नातेवाईक यांना जाहीर करण्यासाठी उपयोगी होते.
कोणत्याही प्रकारचे संकल्पपत्र भरलेले नसल्यास किंवा डोनर कार्ड आपल्या जवळ नसल्यास सुद्धा कुटुंबियांच्या संमतीने देहदान सहज शक्य आहे.
आपल्या देहदानाचा आपण फक्त संकल्प करू शकतो. आपले देहदान आपले कुटुंबीयच करू शकतात.
आपण कितीही संकल्प केलेला असला आणि कुटुंबीयांची तयारी नसल्यास देहदान शक्य नाही.
एखाद्याने देहदान संकल्प केला नसला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांची इच्छा असल्यास सुद्धा देहदान शक्य होते.
म्हणून अवयवदानाची इच्छा असलेल्या व्यक्तीने आपली इच्छा प्रभावी रीतीने कुटुंबीयांकडे व्यक्त करून ते ती पूर्ण करतील याची खात्री करावी.
नातेवाईकांची जबाबदारीही अशी की मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरला डॉक्टरची मदत घ्यावी डॉक्टरची किंवा त्या हॉस्पिटल ची मदत घ्यावी किंवा अवयवदान क्षेत्रात सेवा देणाऱ्या कोणत्याही संस्थेच्या कार्यकर्त्याला आपली इच्छा कळवून त्यांची मदत घ्यावी. सेवाभावी संस्थेच्या मदतीची भूमिका खूप मोलाची व उपयोगी होते असा अनुभव आहे.
‘ दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ‘ या संस्थेचे कार्यकर्ते सुद्धा देशभरात विविध ठिकाणी आपल्या सहकार्यासाठी उपलब्ध होऊ शकतात .
कृपया संपर्क करावा. www.organdonation.net.in
संस्थापक अध्यक्ष: पुरुषोत्तम पवार ( 9822049675 )