‘महादान महाचषक २०२५’ निबंध स्पर्धेचा निकालदि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही संस्था नेत्रदान, देहदान आणि अवयवदानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, शालेय व महाविद्यालयीन शिक्षकांसाठी ‘महादान महाचषक २०२५’ ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांनी स्वतः हा विषय नीट समजावून घेऊन, विद्यार्थी, पालक आणि समाजाला ‘महादाना’चे महत्त्व पटवून द्यावे, हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश होता.या स्पर्धेला महाराष्ट्र आणि गोव्यातील शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उत्कृष्ट निबंधांमुळे परीक्षकांसमोर विजेते निवडण्याचे मोठे आव्हान होते. अखेर, प्राप्त निबंधांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करून परीक्षकांनी खालीलप्रमाणे विजेत्यांची निवड केली आहे:गट क्रमांक १: शालेय शिक्षक गटप्रथम पुरस्कार:संपदा कानिप बागीदेशमुख विद्या मंदिर, बळपवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूरद्वितीय पुरस्कार:संगीता शंकर पाटीलअर्जुन रावराणे विद्यालय, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्गउत्तेजनार्थ:आशा दीपक पंडितश्रीमती हसुमती मोहनलाल पारेख हायस्कूल, मसोली, डहाणू रोड, जि. पालघरगट क्रमांक २: महाविद्यालयीन प्राध्यापक गटप्रथम पुरस्कार:सुचिता प्रसन्ना घरतसेंट जॉन ज्युनिअर कॉलेज, मनोर रोड, जि. पालघरद्वितीय पुरस्कार:लक्ष्मण पांडुरंग देसाईबापूसाहेब देसाई जुनिअर कॉलेज, निगुंडगे, ता. आजरा, जि. कोल्हापूर​सर्व विजेत्यांचे फेडरेशनतर्फे मनापासून अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *